22 November 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा टेंडर घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप

Mumbai Covid Care Center, MLA Nitesh Rane, CM Uddhav Thackeray, Minister Aaditya Thackeray

मुंबई, २५ जून : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड केअर सेंटर राज्य सरकारने उभारले असले तरी रुग्णांचे हाल पाहता सर्वच थरातून सरकारवर टीका सुरु आहे. याबाबत नितेश राणेंनी म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच ऑक्सिजन नसल्याने २२० लोकांचे प्राण गेले असताना आज एका बिल्डरला टेंडर न काढता ऑक्सिजन सिलेंडरचं काम एका बिल्डरला दिलं गेलं. बिल्डर घरं बांधणार की लोकांना ऑक्सिजन सिलेंडर देणार? टेंडर न काढता अनेक कामांचे वाटप केले जात आहे. पेग्विन आणले गेले तेव्हा त्यांना सांभाळण्याचं काम आदित्य ठाकरेंच्या मित्राला दिले गेले, त्याला कोणताही अनुभव नसताना काम मिळालं, फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान १ हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यू संख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे’, असं फडणवीस या पत्रात म्हणाले आहेत.

 

News English Summary: Nitesh Rane has said that beds are not available to corona patients, the status of beds is not stated when calling the helpline and on the other hand thousands of beds are said to be available at Nesco, BKC, so are these beds really to save corona patients? The Kovid Center is being set up without any tender

News English Title: BJP MLA Nitesh Rane allegation on Chief Minister Uddhav Thackeray & Shiv Sena News latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x