22 April 2025 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले?...फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis, Covid 19 Hospitals Death

मुंबई, २५ जून : मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान १ हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यू संख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे’, असं फडणवीस या पत्रात म्हणाले आहेत.

कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याची रणनिती ठरवण्यासाठी अचूक आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल, आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, यासाठी आग्रह धरा, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

दुसरीकडे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड केअर सेंटर राज्य सरकारने उभारले असले तरी रुग्णांचे हाल पाहता सर्वच थरातून सरकारवर टीका सुरु आहे. याबाबत नितेश राणेंनी म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच ऑक्सिजन नसल्याने २२० लोकांचे प्राण गेले असताना आज एका बिल्डरला टेंडर न काढता ऑक्सिजन सिलेंडरचं काम एका बिल्डरला दिलं गेलं. बिल्डर घरं बांधणार की लोकांना ऑक्सिजन सिलेंडर देणार? टेंडर न काढता अनेक कामांचे वाटप केले जात आहे. पेग्विन आणले गेले तेव्हा त्यांना सांभाळण्याचं काम आदित्य ठाकरेंच्या मित्राला दिले गेले, त्याला कोणताही अनुभव नसताना काम मिळालं, फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे.

 

News English Summary: Why are 1000 deaths outside hospitals hidden in Mumbai? Opposition leader Devendra Fadnavis has asked this question to Chief Minister Uddhav Thackeray. Fadnavis has written a letter to the Chief Minister in this regard News latest Updates.

News English Title: Why are 1000 deaths outside hospitals hidden in Mumbai asked question by Devendra Fadnavis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या