22 November 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

बिहार निवडणुकीमुळे लष्करातील जात-प्रांत सांगण्याचे प्रकार..शिवसेनेचा आरोप

PM Narendra Modi, Bihar Regiment

मुंबई, २६ जून : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खालच्या पातळीवर येऊन टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकरांच्या वक्तव्याशी संबंध नाही हा साळसूदपणचा आव आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून याच्या करामतीमुळे भाजपवर चपला खाण्याची वेळ आली आहे. खडसेंना मागे ठेवून फडणवीसांनी आमदार केलेल्या पडळकरांनी पवारांवर घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली. त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. भाजपचे गोपीचंद हे राजकारण, समाजकारण यातील महान व्यक्तीमत्व नाही, पण फडणवीसांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरलं. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केलं ते फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना? असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

तसेच बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सैन्य दलातील जात आणि प्रांताचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शरद पवार हे समाजातील लहान समूहांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी नुकताच केला होता. पण भाजपचे याच राजकारणापोटी पडळकर यांना आमदार केले. या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही तरबेज झाले.

लडाखमधील गलवान खोऱ्यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मग देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले. पण बिहारमध्ये निवडणुका असल्याने सैन्यदलातील जात, प्रांत यास महत्त्व आणले जात आहे. हे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे, असा इशारा ‘सामना’तील अग्रलेखातून देण्यात आला आहे.

 

News English Summary: Shiv Sena has made a serious allegation that Prime Minister Narendra Modi is deliberately mentioning caste and province in the army in the run-up to the forthcoming Assembly elections in Bihar.

News English Title: Prime Minister Narendra Modi deliberately talks about Bihar regiment due to Bihar assembly election News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x