22 November 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कानपूर वसतिगृहात ५७ मुलींना कोरोना, तर ५ मुली गरोदर, मुद्दा उचलताच प्रियंका गांधी लक्ष?

In Kanpur hostel, 57 girls infected with corona, 5 girls pregnant

कानपुर, २५ जून : मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. प्रियंका गांधी- वाड्रा एका नोटीशीला उत्तर देताना म्हणाल्या की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे, हे माझे काम आहे. कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे माझे काम नाही.

माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला सुनावलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत होत्या. यानंतर काही भाजपा नेत्यांकडून गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी, मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा अशा शब्दांत सुनावलं आहे.

कानपूरमधील एका वसतिगृहात गेल्या काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. वसतिगृहातील ५७ मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाली. या व्यतिरिक्त यातील एकूण ५ मुली गरोदर असल्याचेही स्पष्ट झाले होते. यानंतर हा मुद्दा प्रियंका गांधी- वाड्रा उपस्थित करत होत्या.

काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी- वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर कानपूर वसतिगृहात अल्पवयीन मुली गरोदर राहण्यावर आणि विशेषत: एचआयव्ही आणि हेपेटायटीससीचा संसर्ग होण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्तर प्रदेशच्या प्रदेश बाल संरक्षण आयोगाना प्रियंका यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशबाबत संताप व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी प्रियांका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल असंही गांधी यांनी म्हटलं होतं. मात्र या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराचकाळ संघर्ष चालला होता. त्यामुळे प्रियांका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजपा नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

News English Summary: There was a commotion in a hostel in Kanpur a few days ago. It was revealed that 57 girls in the hostel were infected with corona. In addition, a total of 5 girls were found to be pregnant. After this, Priyanka Gandhi-Vadra was raising this issue.

News English Title: In Kanpur hostel 57 girls infected with corona and total of 5 girls were found to be pregnant News Latest Updates.

हॅशटॅग्स

#YogiAdityanath(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x