22 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

चीनच्या अध्यक्षांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी चीनची घुसखोरी नाकारली का? - पृथ्वीराज चव्हाण

Chinese President Xi Jinping, Narendra Modi, Prithviraj Chavan

मुंबई, २६ जून : आज काँग्रेसने देशभरात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली. चीनची घुसखोरी, अतिक्रमण मान्य नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधानांनी का म्हटलं? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी केंद्राच्या सर्व निर्णयांना आम्ही सहकार्य करणार आहे. लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चीनची घुसखोरी कदापि मान्य नाही.

१५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भारतीय भूमीवर कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचा दावा केला. तो धागा पकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रश्न विचारले. आमच्या देशात घुसखोरीच झाली नाही असं अत्यंत धोकादायक विधान मोदींनी का केलं? त्यांच्या विधानाचं चीनकडून स्वागत झालं चीनच्या अध्यक्षांसोबतचे संबंध जपण्यासाठी मोदींनी हा अतिशय धोकादायक दावा केला का? असे प्रश्न चव्हाण यांनी विचारले.

गलवान नदीपात्राच्या परिसरात चीनकडून रस्ते बांधणी केली जात आहे. पूर्व लडाखमधअये चिनी सैनिक तंबू उभारत आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून चीनच्या कुरापती समोर येत आहेत. एप्रिल-मे २०२० पासून चीनने गलवानमध्ये कितीवेळा अतिक्रमण केलं? चीनने घुसखोरी केली नाही असं विधान पंतप्रधान मोदींनी का केलं? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचं अजून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. कोणती रणनीती होती का? याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. देशाच्या सुनिश्चिततेला धोका निर्माण झाल्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि स्पष्टीकरण मागणं विरोधकांचं काम आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे. प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकारचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आतापर्यंत त्यांच्यात १९ बैठका झाल्या आहेत. भारतात आलेले जिनपिंग अहमदाबादलाच गेले होते. त्यामुळे त्यांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी घुसखोरी झालीच नसल्याचा दावा केला का, असा सवाल चव्हाण यांनी विचारला. गलवान खोरं, पँगाँग परिसरात चीननं मोठा फौजफाटा तैनात केला आहे. लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बांधकामं केली आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून ते उघड झालं आहे. त्यामुळे मोदींचा दावा आपोआप खोडला गेला आहे, असं चव्हाण म्हणाले. प्रश्न उपस्थित करणं विरोधकांचं काम असून त्या प्रश्नांना उत्तरं देणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.

 

News English Summary: Chinese President Xi Jinping and Modi have friendly relations. So far they have held 19 meetings. Jinping, who came to India, had gone to Ahmedabad. Therefore, did Modi claim that there was no intrusion in order not to hurt him, Chavan asked.

News English Title: Chinese President Xi Jinping and Modi have friendly relations reason Modi claim that there was no intrusion in order not to hurt him said Prithviraj Chavan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x