22 November 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण

Raj Thackeray, Krushnakunj, Corona Virus

मुंबई, २७ जून : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण आहे.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर याआधीही राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, फक्त राज ठाकरेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाला होता. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचं उदघाटन देखील केलं होतं. पण आता धनंजय मुंडे हे ठीक असून त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

News English Summary: It has come to light that two persons working at the house of MNS chief Raj Thackeray have contracted the corona virus. On Tuesday, Raj Thackeray’s two drivers were found to be infected with corona.

News English Title: The persons working at the house of MNS chief Raj Thackeray have contracted the corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x