22 November 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

चीनकडून पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी, दक्षिण किनाऱ्यावर सैन्याची जमवाजमव

China, Building Helipad, Pangong Tso, Massing Troops, On Southern Bank Of Lake

नवी दिल्ली, २७ जून : चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.

भारत-चीन सीमेवर ४५ वर्षांनी रक्त सांडलं आणि राजकीय वर्तुळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. निवृत्त ले. जनरल एच एस पनाग यांच्या मुलाखतीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला होता. सीमेवर आपल्या जवानांना विनाशस्त्र का पाठवलं.

गलवान खोऱ्यात जी घटना घडली, त्यात गोळीबार झाला नाही असं सांगितलं गेलंय. चीननं कसा विश्वासघात केला हे परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्ययातही समोर आलं. पण मुळात आपल्या जवानांना तिथे विनाशस्त्र का पाठवलं गेलं. त्यांना कुठलंही बँकिंग का दिलं गेलं नव्हतं असा आरोप काँग्रेसनं केलाय.

मात्र आता अनेक इतर तथ्य देखील समोर आली आहेत. प्रत्यक्षात सीमेवर परिस्थिती बदललेली नाही. सध्यातरी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये कुठलीही चर्चा होणार नाही तसेच चीनने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे.

फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरु केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरु केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे.

“पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केलीय हे बरोबर आहे. मागच्या आठ आठवडयात त्यांनी फिंगर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामे केली आहेत, त्यात हेलिपॅड आणखी एक नवीन काम आहे” एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे.

 

News English Summary: At Finger Four, China has begun construction of a helipad for helicopters. There has also been a sudden increase in the number of Chinese troops on the south coast of Pangong TSO. China is claiming the Finger Four.

News English Title: Chinese Building Helipad In Pangong Tso Massing Troops On Southern Bank Of Lake News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x