केंद्र सरकारच्या निकषांनुसार BMC रुग्णालयांसाठी बॉडी बॅग्जची खरेदी - महापालिका
मुंबई, २७ जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणा-या ‘बॉडी बॅग्स’ या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असं बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सदरहू बॉडी बॅग्स खरेदी करण्यासाठी संकेतस्थळाच्या मार्फत खुल्या पद्धतीने तीन वेळा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली. 10 एप्रिल 2020 रोजी मागविण्यात आलेल्या पहिल्या स्वारस्याच्या अभिव्यक्तीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे 21 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली परंतु त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे 2 मे 2020 तिसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली होती, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या तांत्रिक निकषांची प्रतिपूर्ती करणाऱ्या उत्पादनाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या ‘पॅनल’ द्वारेही याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली होती. नियमानुसार तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या व प्रतिसाद दिलेल्या देकारांपैकी सर्वात कमी रकमेची बोली देणाऱ्या संस्थेकडून बॉडी बॅग्ज खरेदी करण्यात आल्या, असं महापालिकेनं सांगितलं आहे.
निवड करण्यात आलेल्या उत्पादनाची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर किंमत ही रुपये 7 हजार 800 एवढी आहे. तथापि, महानगरपालिकेला सदरहू उत्पादन प्रति बॅग रुपये 6 हजार 700 या दरात उपलब्ध झाले आहे, ही बाब आवर्जून लक्षात घ्यायला हवी,असं पालिकेने म्हटलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी वेळोवेळीच्या गरजांनुसार आतापर्यंत 2 हजार 200 बॉडी बॅग्स खरेदी करण्यात आल्या आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे.
तत्पूर्वी, कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता.
संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं की, शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक कंपनींचं कंत्राट रद्द करून इथल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदारांच्या गॅंगला बाहेरचा माणूस नको असतो, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ असंही देशपांडे यावेळी म्हणाले होते.
News English Summary: The BMC has clarified that the ‘body bags’ used in the hospitals of BMC are in accordance with the criteria laid down by the Central Government.
News English Title: Purchase of covid 19 dead body bags for municipal hospitals as per central government norms explanation of BMC News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार