22 November 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

कोरोना आपत्ती: मनसैनिक रस्त्यावर उतरल्याने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कामाचे आदेश दिले

MNS Leader Sanjay Naik, Minister Anil Parab, Covid 19

मुंबई , २७ जून: कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या साधन सामुग्रीमध्ये भ्रष्टाचारा संदर्भात मनसेने शुक्रवारी आरोप केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सध्या कोणतही काम नाही आहे, अशी टीका केली होती. अनिल परब एवढ्यावरच थांबले नाहीत तर,’मनसेला सध्या दुसरं कुठलं काम नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्याला मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी प्रतिउत्तर दिले.

दरम्यान शिवसेना आणि मनसेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. अनिल परब यांना परिवहन खात कळत नाही कोरोनाच्या काळात ते गायब होते. कोरोनाच्या काळात त्यांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं. पण परिवहन मंत्री अनिल परब हरवले होते आता ते सापडले आहेत, असा आरोप संजय नाईक यांनी केला आहे.

कोरोनाच्या आपत्तीच्या काळात शिवसैनिक घरात बसून होता त्यावेळी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून काम करत होता. मनसैनिक रस्त्यावर दिसू लागल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काम करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या काळात सर्व सामान्यांसाठी काम करणे हा आमचा अजेंडा होता हे त्यांच्या लक्षात आलेले नाही असं म्हणत संजय नाईक यांनी अनिल परब यांना प्रतिउत्तर दिलं आहे.

 

News English Summary: In the time of Corona, Shiv Sainik was sitting at home while Mansainik was working on the road. Uddhav Thackeray has ordered Shiv Sainiks to work after Mansainiks started appearing on the streets.

News English Title: MNS Leader Sanjay Naik on state transport Minister Anil Parab News Latest Updates.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x