19 April 2025 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

नरेंद्र मोदींनी कोरोनापुढे हात टेकले, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योजनाच नाही - राहुल गांधी

Rahul Gandhi, Modi government, fight against Corona

नवी दिल्ली, २७ जून : देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे करोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे हात टेकले आहेत. शनिवारी देशातील करोना रुग्णांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली. तर देशात आत्तापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात या करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव हा देशातल्या इतर भागांमध्येही वेगाने वाढतो आहे. करोनाचा मुकाबला करुन त्याला हरवणार अशा वल्गना दिल्या गेल्या प्रत्यक्षात मोदी सरकारकडे यासाठीचे कोणतेही धोरण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे हात टेकले आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी (27 जून) याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जवळपास तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

 

News English Summary: Former Congress president Rahul Gandhi has said that the Modi government has no plans to fight against Corona in a situation where the number of patients is increasing. Prime Minister Narendra Modi has laid his hands on this disease.

News English Title: Former Congress president Rahul Gandhi has said that the Modi government has no plans to fight against Corona News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या