22 October 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, फायदा घ्या - GMP IPO Reliance Share Price | कमाईची मोठी संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज सहीत हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRB Shraddha Kapoor Entry In Pushpa 2 | श्रद्धाची पुष्पा 2 मध्ये एन्ट्री, स्त्री 2 नंतर गाजवणार 'पुष्पा 2', बॉक्स ऑफिसवर धमाल Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News ICICI Mutual Fund | जबरदस्त फायद्याचा फंड, SIP बचतीवर मिळेल 52.46 टक्केपर्यंत परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

उद्धव ठाकरे साहेब उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे उभे : एकनाथ शिंदे

मुंबई : कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

एकूणच आमदार प्रकाश सुर्वे आयोजित ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलन म्हणजे “उत्तर भारतीयो के सन्मान मे आमदार प्रकाश सुर्वे मैदानमे ” असे चित्र या संमेलनात होते. येत्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार महत्वाची भूमिका बजावणार असल्याने शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांना साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मुंबईत जेंव्हा उत्तर भारतीयांना काही जणांनी मारपीठ केली होती,त्यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती असे गौरवोद्गार मंत्रीमहोदय एकनाथ शिंदे यांनी काढले. आमचा पक्ष सदैव उत्तर भारतीय समाजाच्या पाठीशी उभा आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भसरतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेत महत्वाची पद देण्यात आल्याची आठवण सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला करून दिली. तसेच ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलन’ यशस्वी केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आमदार सुर्वे यांचे तोंड भरून कौतुक केले. यापुढेही उत्तर भारतीय आणि शिवसेना पक्षाचे नाते वाढीस लागो अशी इच्छा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाला विशेष भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित शिवसेना नेत्यांकडून सुद्धा या कार्यक्रमाला मोठी दाद दिली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x