22 April 2025 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर, जगभर कोरोनाचे ५ लाख बळी

World, Covid 19, Corona Virus, Covid Patients

नवी दिल्ली, २८ जून : गेल्या ६ महिन्यांपासून जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ कोटीवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने एक कोटींचा टप्पा ओलांडला. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. पण ती आशा फोल ठरली आहे. एप्रिल, मे आणि जून या ३ महिन्यांच्या कालावधीत ९० टक्के कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, असे या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे कोरोनावाढीचा वेग मंदावेल आणि रुग्ण संख्येत घट होईल, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु एप्रिल आणि मेमध्ये ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण सापडले, त्यावरून हा अंदाज फोल ठरला. या दोन महिन्यात ६७ टक्के रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत दररोज रुग्णवाढीचा वेग सरासरी एक लाख होता. कोरोनाने मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे १ लाख ९० हजारांहून जास्त लोकांचे बळी घेतले आहेत. इटली, फ्रान्स, स्पेन येथे कोरोनाने धुमाकूळ घातला असताना अमेरिकेत त्याने कहर केला होता. जूनमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र त्यातील ६० टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या मृत्युदरात काही प्रमाणात घट झाली आहे. जगात कोरोनाने ५ लाख लोकांचा बळी घेतला असून ५५ लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. मात्र, आता हा आकडा २० हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या १६,०९५ झाली आहे. तीन लाख ९ हजार ७१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर दोन लाख ३ हजार ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

 

News English Summary:

News English Title: Over one crore Corona virus cases in the world 90 of patients in 3 months News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या