24 November 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

अमेरिकेत एका दिवसात ४० हजार नवे रुग्ण, टेक्सास व फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

Covid 19, Corona Virus, World, Lockdown

वॉशिग्टन, २८ जून : अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, एका दिवसात तब्बल ४० हजार नवे रुग्ण आढळल्याने तेथील दोन प्रांतांमध्ये काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टेक्सासच्या गव्हर्नरनी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर फ्लोरिडामधील रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.

रेस्टॉरंट व बारमध्ये अनेक तरुण गर्दी करीत असून, ते मास्क अजिबात वापरत नाहीत आणि फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत, असे दिसून आले आहे. तरुणांमध्येच कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असून, त्याची हीच कारणे असावीत, असे जाणवल्याने टेक्सासमध्ये बार बंद करण्याचा आणि फ्लोरिडामध्ये मद्यविक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे तेथील प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान मागील गेल्या ६ महिन्यांपासून जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ कोटीवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने एक कोटींचा टप्पा ओलांडला. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. पण ती आशा फोल ठरली आहे. एप्रिल, मे आणि जून या ३ महिन्यांच्या कालावधीत ९० टक्के कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, असे या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

News English Summary: As many as 40,000 new patients were diagnosed in a single day in the United States, with some new restrictions being imposed in the two states. The governor of Texas has ordered the closure of all bars, while the sale of liquor in restaurants and bars in Florida has been stopped.

News English Title: Covid19 Restrictions in two states due to increased infection in the United States Order to close the bar News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x