22 November 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

CM Uddhav Thackeray, Lockdown

मुंबई, २८ जून : ३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्लाझ्मा थेरपीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
चहुबाजूला आपली नजर आहे. कोणत्या देशात नेमकं काय सुरू आहे? प्लाझ्मा थेरपी आपण मार्चपासून करत आहोत. प्लाझ्मा थेरपीचा वापर आता आपण करत आहोत. त्याकरता उद्या सोमवारी कदाचित देशातील सर्वात जास्त प्लाझ्मा थेरपीच्या केंद्राचं लोकार्पण करण्यात येणार आहे. रक्तदान करतो त्याप्रमाणे प्लाझ्माचं देखील दान करता येतं. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करावं.

औषध मोफत उपलब्ध करून देणार?
कोरोनासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप करणार. शासकीय आणि निमशासकीय रूग्णालयात या औषधांच मोफत वाटप करणार. त्यामुळे रूग्ण वाढले तरी त्यांना उपचार मिळणार हा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. रूग्णांची संख्या वाढली तरी उपचाराची सुविधा देखील वाढली आहेत. रूग्णांना औषध मोफत उपलब्ध होण्याची सुविधा केली जाणार आहे.

 

News English Summary: The lockdown ends on June 30. The next question will be in your mind. Will there be a lockdown after June 30? Chief Minister Uddhav Thackeray has said that the answer is no. Also, will it continue like this? So the answer is no.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray Important Statement About Lockdown News Latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x