24 November 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

फडणवीसांच्या विरोधी गटातील अनेक नेते त्यांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, विरोधकांची काय चूक

Maharashtra, Anil Gote, Devendra Fadnavis, tarbuja

धुळे, २९ जून : भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत होता. त्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही असं विधान त्यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले होते. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र तीव्र झाला होता.

आता पुन्हा माजी आमदार अनिल गोटे यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातही एक खुलासा केला आहे. फडणवीस यांचे टरबुज्या हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेतेच असल्याचा दावा गोटे यांनी केला आहे.

भाजपामधील नेत्यांचे बारसे अन्य कुणाला करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. “एकमेकांमधील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसं साजरं केलं. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे. आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झालं आहे. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय?,” असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. पुढे बोलताना गोटे यांनी भाजपामध्ये नावं छोटी करुन वापरण्याची पद्धतच असल्याचे म्हटले आहे. “भाजपामध्ये स्वत:च नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पद्धत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अमित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत,” असा टोला गोटे यांनी लगावला आहे.

 

News English Summary: In a statement issued by former MLA Anil Gote, he also made a statement regarding former Maharashtra Chief Minister and current Leader of Opposition Devendra Fadnavis. Gote has claimed that the name of Fadnavis’ Tarbujya is the reason behind the spread of BJP.

News English Title: NCP Leader Anil Gote Take Dig At Fadanvis Says His Own Party Leader Gave Him Infamous Nickname News latest Updates.

हॅशटॅग्स

#AnilGote(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x