22 November 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

पतंजलीचा कोरोनिलवरून यू-टर्न, पण फडणवीसांच्या माजी राजकीय सल्लागाराकडून असा प्रचार

Shweta Shalini, Promoting coronil, Patanjali, Ramdev Baba

नवी दिल्ली, ३० जून : प्रत्येकाच लक्ष करोनावरील औषधाकडे लागलेलं असताना बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं मागील आठवड्यात करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर त्यांनी हे औषध बाजारातही आणलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

आम्ही कधीही कोरोनावरील औषधं तयार केल्याचा दावा केला नव्हता, असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं. आम्ही सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन औषध तयार केलं. त्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. आमच्या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होतात, असा दावा आम्ही केला होता. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं दिलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिलं आहे, असं बाळकृष्ण यांनी सांगितलं.

२३ जूनला पतंजली आयुर्वेदनं राजस्थानच्या निम्स विद्यापीठासोबत कोरोनाचं औषध तयार केल्याचा दावा केला. या औषधाला कोरोनिल आणि श्वासारी वटी असं नाव देण्यात आलं. रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण आणि निम्स विद्यापीठाच्या संचालकांच्या उपस्थितीत हरिद्वारमध्ये कोरोनिल लॉन्च करण्यात आलं. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माजी राजकीय सल्लागार श्वेता शालिनी यांनी गुगलवर हळद सर्वाधिक सर्च होऊ लागल्याने त्याचा भलताच संदर्भ पुन्हा पतंजलिच्या कोरोनिलशी जोडला आहे. त्यासाठी रामदेव बाबांच्या कोरोनीलची वाट पाहूया असा काहीही संदर्भ नसलेलं ट्विट श्वेता शालिनी यांनी केलं आहे. त्यामुळे पतंजलीने स्वतः दावा संपुष्टात आणला असला तरी भाजप समर्थक मंडळी अजून त्याच प्रचारावर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Shweta Shalini, a former political adviser to former state chief minister Devendra Fadnavis, has re-linked her to Patanjali’s Coronil as turmeric has become the most searched word on Google.

News English Title: Shweta Shalini still promoting coronil even after Patanjali has denied coronil impact against covid 19 news latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x