23 November 2024 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

तुम्ही इकडच्या तिकडच्या बाता करू नका, मोदींना शायराना टोला

Congress MP Rahul Gandhi, Prime Minister Narendra Modi

नवी दिल्ली, ३० जून : पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपर्यंत राशन मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांनी शेतकरी आणि टॅक्स भरणाऱ्यांचे ही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-१ नंतर बेजबाबदारपणा वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केला.

चीन मुद्द्यावर सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत असलेल्या राहुल गांधी यांनी, पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वीच, पंतप्रधानांनी चीन मुद्द्यावरील सरकारची भूमिका आणि कारवाईसंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन केले होते. राहुल गांनी यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला होता, की ‘चिनी सैनिक लडाखमध्ये 4 ठिकाणी बसले आहेत. नरेंद्र मोदीजी देशाला सांगा, की आपण चिनी सैन्याला देशातून केव्हा काढणार आणि कसे?

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App वर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक जुना शेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi, who has consistently targeted the central government over the China issue, had earlier, in his address, called on the Prime Minister to provide information on the government’s role and actions on the China issue.

News English Title: Congress MP Rahul Gandhi Criticize Prime Minister Narendra Modi Over His Speech News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x