24 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाही; पण आरोग्यत्सव साजरा होणार

Lalbaug Ganeshotsav Mandal, Covid 19

मुंबई, १ जुलै : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवातून काढता पाय घेतला आहे. कोरोना व्हायरसचं आव्हान पाहता नाईलाजास्तव आणि समाजहितासाठी म्हणून मानाची मंडळं या निर्णयावर पोहोचली आहेत. यातच आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या वर्षी हे पर्व साजरा न करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

यंदा जगावर कोरोना संकट आहे. सरकार, कोरोना योद्ध्ये दिवस-रात्र कोरोनाशी झटत आहेत. अशात गर्दीमुळे संसर्ग वाढू नये यासाठी यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला असून मंडळाकडून आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत आम्ही रक्तदान शिबीर राबविणार असून जे रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन करणार आहोत’, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या वीरमाता, वीर पत्नी आणि कुटुंबीयांचा सन्मानही मंडळाकडून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एकीकडे कोरोना संकट असताना दुसरीकडे भारत भूमीच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक झटत आहेत. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचाही मंडळाकडून सन्मान करण्यात येणार आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.

 

News English Summary: The Ganeshotsav Mandal, the king of Lalbaug, which is known as the Ganpati of Navsa, has decided not to celebrate this festival this year.

News English Title: Lalbaug Ganeshotsav Mandal has decided not to celebrate this festival this year because of corona crisis News latest.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x