11 March 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 67 रुपये टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्स साठी BUY रेटिंग - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर घसरतोय, पण तज्ज्ञांना विश्वास, काय आहे पुढची टार्गेट प्राईस पहा - NSE: RPOWER GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या जवळ आली पेनी स्टॉक प्राईस, ही आकडेवारी अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, होईल मजबूत कमाई - NSE: NTPC Reliance Share Price | मॅक्वेरी ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला, स्वस्तात खरेदीची संधी, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Horoscope Today | 11 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 11 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मुंबईत निधन

Bollywood, Famous Choreographer Saroj Khan, Passes Away

मुंबई, ३ जुलै : बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं.

 

News English Summary: Well known Bollywood choreographer Saroj Khan passed away on Friday morning. She was 71 years old. He died of cardiac arrest. He was admitted to Guru Nanak Hospital in Bandra on June 17 due to respiratory problems.

News English Title: Bollywood Famous Choreographer Saroj Khan Passes Away Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x