19 April 2025 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्रातलं सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत - नारायण राणे

MP Narayan Rane, Covid 19, Maharashtra Govt

मुंबई, ४ जुलै : महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यातील परिस्थतीवरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील जनता सुरक्षित नाही, देशात सर्वाधिक भयंकर परिस्थिती राज्यात आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. रुग्णांची अवस्था काय आहे? ना औषध ना उपचार ना काही. सरकारमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही. लोकांचे व्यवहार बंद आहेत. लोक त्रस्त आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? घरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकूश नाही. सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशा कडक शब्दांत भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते. महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही. भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कोणाचं कोणाला पटत नाही, असा प्रहार त्यांनी केला. शिवाय, महाराष्ट्रातील वाढती मृत्यूसंख्या लक्षात घेता महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाही, असंही ते म्हणाले.

 

News English Summary: Is it possible to run the government from home? There is no control over the government system. BJP leader Narayan Rane slammed the state government, saying the government has failed miserably. He was speaking in an interview given to BBC Marathi.

News English Title: State government is responsible for Corona virus death is the state said BJP MP Narayan Rane News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या