23 November 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

सेमिनार हॉलला हॉस्पिटल बनवलं, ना सलाईन, औषधं, डॉक्टर..रुग्नांना बैठे-बैठे सावधान? - काँग्रेसची टीका

Prime Minister Narendra Modi, Leh, Army personnel meet, Hospital

नवी दिल्ली, ४ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानक कुशॉक बाकुला रिमपोची विमानतळावर दाखल झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल होईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनाही मोदींच्या या दौऱ्याबद्दल कुठलीही पूर्वकल्पना नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा लेह दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. कारण मोदींच्या दौऱ्यानंतर सर्वच माध्यमांवर याच बातम्या झळकू लागल्या होत्या. विशेष म्हणजे याच दौऱ्यावर असताना त्यांनी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत जखमी झालेल्या जवानांची इस्पितळ भेट घेतली होती. मात्र त्याच इस्पितळातील भेटीची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.

मोदींनी ज्या इस्पितळाला भेट दिली ते इस्पितळ नसून सेमिनार हॉल असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ज्या जखमी जवानांची मोदींनी इस्पितळात भेट घेतली होती, त्या इस्पितळात जवान बैठे बैठे सावधान पोझिशनमध्ये होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या इस्पितळातील फोटो समोर आल्यावर ते नेमकं इस्पितळंच होतं का असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जाऊ लागला आहे.

म्हणजे त्या इस्पितळात रुग्णांच्या खाटेच्या बाजूला ना सलायण, ना आजुबजुला डॉक्टर, ना पेशंट जवानांच्या बाजूच्या टेबलवर औषध-पाणी अशा अनेक गोष्टी नजरेस देखील पडत नव्हत्या. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान येणार म्हणून हॉस्पिटलमध्ये विशेष सुरक्षा आणि स्वच्छता समजू शकतो, पण संपूर्ण इस्पितळ हे हॉटेलसारखं परिवर्तित करत नाहीत. त्यासाठी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जेव्हा इस्पितळांना भेटी द्यायचे तेव्हा मूळ इस्पितळ हे इस्पितळंच दिसायचं, म्हणजे रुग्णांच्या खाटांच्या लागून सलायण, सोबत डॉक्टर, पेशंटच्या बाजूला औषध-पाणी असं सर्वकाही सहज नजरेसमोरच दिसतं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांच्या या गुप्त दौऱ्यात सर्वाधिक स्वातंत्र्य हे फोटो ग्राफरलाच असल्याचं दिसत आहे, ज्याने मोदींचे शेकडो फोटो विविध अँगलमधून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi suddenly landed at Kushok Bakula Rimpochi Airport on Friday morning and everyone was shocked. Because Prime Minister Modi was kept in Leh until his visit was kept extremely secret.

News English Title: Prime Minister Narendra Modi Leh visit and army personnel meet in hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x