सामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश
मुंबई, ४ जुलै : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अक्षय कुमारचा दौरा होता, येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग होतं. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागतही केलं जातं. तसेच, अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयकुमारच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला.
मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करावा, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वच हॉटेल्स अन् रिसॉर्ट बंद असतानाही, अक्षयसाठी तारांकीत रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले, येथे अक्षयकुमारचा पाहुणचार कसा झाला? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अक्षयकुमारच्या संपूर्ण दौऱ्याच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.
News English Summary: Bollywood super star Akshay Kumar is likely to get in trouble due to Nashik tour. At the beginning of July, Akshay Kumar was staying near Nashik for two days. Akshay Kumar had come to Nashik by helicopter, so this tour of Akshay Kumar is likely to find controversy.
News English Title: Bollywood superstar Akshay Kumar Nashik Tour In Controversy News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News