22 November 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणासाठी ICMR आटापिटा करत आहे का? - पृथ्वीराज चव्हाण

Congress Leader Prithviraj Chavan, PM Narendra Modi, Covaxin, Coronavirus, Red Fort

नवी दिल्ली, ४ जुलै : कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.

आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस तयार करण्याचा देशाचा हा पहिलावहिला व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याच्या कामात सहभागी असलेल्या १२ संस्थांनी आपले प्रयोग जलद गतीने पार पाडावेत.

दरम्यान विरोधी पक्षांनी यावरून टीका करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला आहे.

 

News English Summary: The Indian Council for Medical Research (ICMR) is gearing up to make the first home-made covacin vaccine against corona infection available on Independence Day, August 15. The trial of the covacin, which is being developed in collaboration with the National Institute of Virology in Pune and Bharat Biotech, should start from July 7. Balram Bhargava has sent twelve concerned institutions.

News English Title: Former CM Congress Leader Prithviraj Chavan Criticize PM Narendra Modi Covaxin Coronavirus Red Fort 15th August News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x