22 April 2025 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोरोना योद्धयांचे पगार कापणाऱ्या ठाकरे सरकारकडून मंत्र्यांसाठी कार खरेदीला मान्यता

Maharashtra government, purchase of six cars, ministers and officials

मुंबई, 4 जुलै: मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

मंत्र्यांच्या गाडी खर्चाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आता गाडी ही काय प्राथमिकता असू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत कडक धोरण स्वीकारले पाहिजे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवातून काही सूचना करत असतील. आम्हालाही ते सूचना करायचे. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवायचे आहे की सूचनांची अमलबजावणी कशी करायची आहे, असं फडणवीस म्हणाले .

मात्र लॉकडाउनमुळे महसूल बुडाला असताना तसेच करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गावरील उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार्स खरेदीला मान्यता दिली आहे. यासंदर्भात शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. पुढील महिन्यापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठीच कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेले असतानाही राज्य शासनाने मंत्र्यांसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहा कार्सच्या खरेदीला मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन निर्णयानुसार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या पाच पदांसाठी पाच कार आणि एक स्टाफ कारसाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने मान्यता दिली आहे.

 

News English Summary: The state government has approved the purchase of six cars for ministers and officials amid a drop in revenue due to the lockdown as well as huge spending on measures to combat the growing contagion of the corona virus. A ruling has also been announced in this regard.

News English Title: The state government has approved the purchase of six cars for ministers and officials News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या