22 November 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेग पुन्हा पसरतोय, चीनमध्ये हाय अलर्ट

Chinese City, High Alert, Bubonic Plague

बीजिंग, ६ जुलै : कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात.

या आजाराचे नाव आहे ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague) आहे. उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सध्या दोन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्यापर्यंत लगेच पसरतो. यामुळेच शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसऱ्या स्तरावरील इशारा दिला आहे. बयन्नुरच्या एका रुग्णालयात शनिवारी ब्यूबॉनिक प्लेगचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाने जारी केलेला अर्लट २०२० या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे.

सध्या शहरामध्ये हो रोग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणाकरता जागृत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

“सध्या शहरामध्ये प्लेगचा संसर्ग होण्याची भिती आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी जतनतेने जागृक राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देणं गरजेचं आहे,” असं बयन्नुरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारी वृत्तसंस्थेने १ जुलै रोजी दिलेल्या वृत्तामध्ये पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचे नमूद करण्यात आलं होतं. या रुग्णांना झालेला संसर्ग हा ब्यूबानिक प्लेगचाचा असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर स्पष्ट झालं होतं.

 

News English Summary: The disease is called bubonic plague. A high alert has been issued following the discovery of two suspected cases of bubonic plague in a city in northern China. According to Chinese media, two cases have been reported so far, with the disease spreading rapidly from one person to another.

News English Title: Chinese City On High Alert After Suspected Case Of Bubonic Plague News Latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x