हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होतोय, पण WHO याबद्दल गंभीर नाही - शास्त्रज्ञांचा दावा
वॉशिंग्टन, ६ जुलै : जगात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रसार नक्की चीनमधून झाला की नाही? याचा शोध सध्या जागतिक आरोग्य संघटना घेत आहेत. कोरोनाव्हायरसच्या बाबतीत चीनला मदत केल्याच्या आरोपाचा सामना करणारी WHO आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात WHOच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरतो, परंतु WHO याबद्दल गंभीर नाही आहे, असा आरोप या वैज्ञानिकांनी केला आहे.
हे शास्त्रज्ञ म्हणतात की, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकामधून मोठे थेंब बाहेर येण्याबरोबरच, श्वासोच्छवासादरम्यान पाण्याचे लहान थेंबदेखील हवेमध्ये पसरतात आणि एखाद्या व्यक्तीस संक्रमित करतात. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की हवेमध्ये विषाणू सापडल्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, ‘शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहलं आहे. करोना विषाणूचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे.’ हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे. २०१९ वर्षाअखेरीस चीनमधील वुहान येथे करोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे.
News English Summary: An open letter has been written by 239 scientists from 32 countries about the corona, questioning WHO’s claims. The scientists claim that the coronavirus also spreads through the air, but the WHO is not serious about it, the scientists allege.
News English Title: Coronavirus Is Airborne Say Scientists Ask Who To Revise Rules News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार