22 November 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

अजित दोवालांमुळे नव्हे, भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या ३० जूनचा चर्चेचं फलित - चीन परराष्ट्र मंत्रालय

China, India, Ladakha Dispute

बीजिंग, ६ जुलै : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.

तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत. कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

दरम्यान, ३० जूनला झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीमध्ये पडताळणीची प्रक्रिया देखील ठरवण्यात आली होती. यात एक पाऊल उचलल्यानंतरच पुरावे पाहून दुसरे पाऊल उचलले जाईल असे ठरवण्यात आले होते. या पडताळणीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय गस्ती पथक देखील प्रत्यक्षात पाहणी करेल. जेव्हा अशी पडताळणी होईल, तेव्हाच दुसरे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर आपली सहमती दर्शवली आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी आता गलवान खोरे आता बफर झोन झाले आहे.

मागील महिनाभर भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि चीन लष्कराचे अधिकारी यांच्यात तणाव कमी करण्यावरून चर्चा सुरु होती आणि त्यानिमित्ताने अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. ३० जून रोजीची बैठक देखील त्याचाच भाग होती. असं असताना याविषयात अचानक प्रकाश झोतात आलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या भारतीय प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आले असून त्यांनी काल रविवारी रात्री चीनच्या प्रतिनिधींसोबत फोनवर चर्चा केली आणि चीन राजी झाला अशा बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत, मात्र चीनने त्यांना भारताचे सुरक्षा सल्लागार म्हणून माहिती दिली आहे. मात्र तणाव निवळण्यावर आणि २ किलोमीटर पर्यंत चिनी सैन्य मागे घेण्याचं कारण ३० जून रोजी भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि चिनी सैन्याचे अधिकारी यांच्यात झालेल्या सकाराम्तक चर्चेचं फलित असल्याचं स्वतः चीनच्या परराष्ट्र खात्याने सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: China and India have made progress coming up with effective measures for frontline troops to disengage and deescalate the border situation at the third commander-level talks between the two militaries on June 30, said FM spokesperson Zhao Lijian.

News English Title: China and India have made progress coming up with effective measures for frontline troops to disengage and deescalate the border situation News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x