22 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

रुग्णांची लूट, रुग्ण व्यवस्थापनही कमतरता, ठाण्यात २-३ रुग्ण बेपत्ता - फडणवीस

Devendra Fadnavis, Covid 19, Corona Virus, MahaVikas Aghadi

ठाणे, ६ जुलै : ठाण्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मुंबईपेक्षा ठाण्याची परिस्थिती अधिक गंभरी होत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला भेट दिली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

ठाण्यातील रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर अशा सर्वच ठिकाणी संसर्ग प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई आणि एमएमआरमधील ७० टक्के रुग्ण, तर मृत्यू सुद्धा याच भागात अधिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चाचण्या वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचे अहवाल तात्काळ आले पाहिजेत,” अशी सूचना फडणवीस यांनी केली.

“मृत्यूदर वाढणे ही बाब अधिक चिंताजनक आहे. राज्यातील महापालिकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळायला दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आयसीसीयू बेड कमी पडत आहेत. दुसरीकडे रुग्ण व्यवस्थापनही कमी पडत आहे. आरोग्य सेवकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले.

देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण फारच अधिक आहे. प्रति १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नवव्य क्रमांकावर आहे. कमी चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण असून, सातत्याने सांगतो आहे. अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आलेली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाहीत,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: The number of victims in Thane is increasing day by day and the situation in Thane is becoming more serious than in Mumbai. Against this backdrop, former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis visited Thane.

News English Title: Devendra Fadnavis Govt Should Stop To Private Hospital Who Charge Extra Money For Treatment News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x