22 November 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणाऱ्यांवर आज नगरसेवकांसाठी भीक मागण्याची वेळ

MNS leader Sandeep Deshpande, Shivsena, Parner corporators

मुंबई, ७ जुलै : दोन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.

येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.

दरम्यान, मनसेने शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेनं मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. त्याचा दाखला देत मनसेनं शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. “रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः”, अशा शब्दांत देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेनं ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले होते. महापालिकेतील सत्ता स्थिर राखण्यासाठी शिवसेनेनं ही खेळी केली होती. मनसेवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं त्यावेळी शिवसेना नेत्यांनी म्हटलं होतं. मनसेचे नगरसेवक फोडल्यानं शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ वाढलं. शिवसेनेच्या या खेळीमुळे मनसेला जोरदार धक्का बसला. आता काहीशी तशीच परिस्थिती शिवसेनेवर पारनेरमध्ये ओढवली आहे. अजित पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेला हादरा बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा संदर्भ देत मनसेनं शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

 

News English Summary: Three years ago, Shiv Sena had sacked six MNS corporators in Mumbai. Giving proof of this, MNS has sharply criticized Shiv Sena. MNS general secretary and former corporator Sandeep Deshpande tweeted that he has castigated Shiv Sena.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande slams shivsena over parner corporators issue News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x