22 November 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही - संजय राऊत

Sharad Pawar, Matoshri, MP Sanjay Raut

मुंबई, ७ जुलै : शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही, अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना, तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त तणावाची पार्श्वभूमी होती, असंही म्हटलं जात आहे.

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. “महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत,” असं थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिक्षण मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या प्रकरणावरही थोरात यांनी भाष्य केलं. “वाहन खरेदीची वृत्त पूर्ण माहितीच्या आधारावर देण्यात आलेलं नाही. सहा वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. पण, एक वाहन खरेदीचाच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असं थोरात म्हणाले.

 

News English Summary: It is not the case that Sharad Pawar had to come to Matoshri, he meets the Chief Minister from time to time. There are no differences in government.

News English Title: It is not the case that Sharad Pawar had to come to Matoshri said MP Sanjay Raut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x