22 November 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

भोंगळ कारभार, कोरोना रुग्ण जिवंत असताना मृत्यू झाल्याचा कुटुंबियांना कॉल

corona, Bhimsen Joshi Hospital, Bhayander

मीरा रोड, ७ जुलै : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० आहे, तर मुंबईत ही संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ४ हजार ९३८ आहे.

दुसरीकडे मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र त्यासोबत कोरोना रुग्णांच्या नातेवाहिकांना देखील धक्कादायक अनुभवांना सामोरे जावं लागत आहे. तसाच काहीसा विचित्र प्रकार मीरा रोड येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सामान्य इस्पितळात घडला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत एकूणच पालिका कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातून केला गेला होता. त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांंनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयू बेड रिकामा नसल्याने आणि सदर कुटुंबाला खाजगी रुग्णालयात खर्च परवडणारा नसल्याने रुग्णाच्या नातलगांनी रुग्णाला रुग्णवाहिकेतून मुंबईच्या नायर रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि ती रुग्णवाहिका देखील मुंबईतून मागविण्यात आली होती. 3 जून रोजी सकाळी रुग्णवाहिका मुंबई वरुन निघाली असताना दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना जोशी रुग्णालयातून बोलत असल्याचा फोन आला आणि तुमचा रुग्ण मरण पावल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर मुंबईवरुन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकास येऊ नको असा निरोप दिला. पण नातलगांनी रुग्णालयात चौकशी केली तेव्हा मात्र रुग्ण जिवंत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने नातलगांचा संताप अनवार झाला. मग पुन्हा रुग्णवाहिका चालकास येण्यास कळवले असता तो पर्यंत नायर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा बेड निघून गेल्याने मग सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण महिलेस नेण्यात आले.

 

News English Summary: The family of a woman infected with corona had received a call from Bhimsen Joshi Hospital in Bhayander that a wrongly informed patient had died. The woman’s relatives then went on the radar. But then it was said that the call was made by mistake.

News English Title: The family of a woman infected with corona had received a call from Bhimsen Joshi Hospital in Bhayander that a wrongly informed patient had died News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x