22 November 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

२०१३ मधील चीनबद्दलच्या त्या ट्विटमुळे नरेंद्र मोदी अडचणीत..पहा काय होतं ट्विट

PM Narendra Modi, Congress, India China, Gujarat CM Narendra Modi, Ladakha

नवी दिल्ली, ७ जुलै : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.

तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. आता दोन्ही बाजूनी म्हणजे भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत. कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

मात्र यावरूनच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरलं आहे. सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जुन्या वाक्याची आठवण करून दिली. सुरजेवालांनी विचारले, ‘ आदरणीय पंतप्रधानजी, तुम्हाला तुमचे शब्द आठवतात का? काय तुमच्या शब्दाला काही महत्त्व आहे का? आता तुम्ही सांगू शकला का की आमच्याच भूमीवरून आमचेच सैनिक मागे का हटत आहेत?’. देशाला उत्तर हवे आहे, असेही सुरजेवाला यांनी पुढे लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१३ मध्ये हे ट्विट केले होते. त्यावेळी मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘चीन आपल्या सैनिकांना हटवत आहे, मात्र भारतीय सैनिक आपल्या क्षेत्रातून मागे का हटत आहेत, याचे मला आश्चर्य वाटत आहे? आम्ही का हटत आहोत?’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा हे ट्विट केले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते लोकसभा निवडणूक २०१४ साठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. याच कारणामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या मुद्द्यावर सक्रिय होते.

 

News English Summary: Surjewala reminded Prime Minister Narendra Modi of his old phrase. Surjewala asked, ‘Respected Prime Minister, do you remember your words? Does your word matter? Now can you tell us why our soldiers are retreating from our land? ‘. The country wants an answer, Surjewala further wrote.

News English Title: India China clash congress reminds PM Narendra Modi his comments on troops withdrawal with his old tweet of 2013 when Modi was CM of Gujarat News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x