22 November 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तर भारतात प्रतिदिन २ लाख ८७ हजार कोरोना रूग्ण आढळतील - MIT संशोधन

MIT Study Reveals, India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, ८ जुलै : जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत एकूण ६०२०९ नवीन रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त १११४ मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या आता १.३१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या जवळपास ३१ लाखांवर आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाबतीत गेल्या एका आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे आणि दररोज सरासरी ५० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत जवळजवळ सर्व काही उघडलेले आहे आणि लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय वावरत आहेत.

तसेच अमेरिकेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या बर्‍यापैकी जास्त आहे. अमेरिका दररोज सुमारे ५ लाख चाचण्या करत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीस कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, कोरोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात करोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असं सागंण्यात आलं आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.

एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास २०२१ मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान असेल.

या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे.

 

News English Summary: Researchers at the Massachusetts Institute of Technology (MIT) have predicted that India could be in a worse shape by next year if a vaccine is not found. According to their study, India could be the worst-affected country in the world with 2.87 lakh cases every day. The study also revealed that the number of cases worldwide could be significantly high if treatment is not found.

News English Title: MIT Study Reveals India Might See 2 87 Lakh Covid Cases Per Day By February 2021 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x