22 November 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

पुढील ३ महिने शिवभोजन थाळी १० वरुन ५ रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय

Mahavikas Aghadi, Shivbhojan Thali, Covid 19

मुंबई, ८ जुलै : महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत 10रुपयांवरुन 5 रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत मिळणार आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात तीन महिन्यांसाठी या थाळीची किंमत 10 वरुन 5 करण्यात आली होती. ती सुविधा आता आणखी तीन महिन्यांसाठी लागू असेल. मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

जल जीवन मिशनलाही सुरुवात करण्यात येणार असून राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत उत्पादित झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ”आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण करण्यात आले आहे. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय.
  • महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता.
  • जल जीवन मिशन.
  • राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय.
  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ” आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण.
  • आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी
  • शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये एवढा करणे
  • एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार
  • मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा 2 राज्यात राबविणे

 

News English Summary: Mahavikas Aghadi Pranit Thackeray’s government has increased the price of Shivbhojan Thali from Rs 10 to Rs 5 for another three months in the cabinet meeting today. For the next three months, Shiv Bhojan Thali will be available for just 5 rupees.

News English Title: Mahavikas Aghadi Shivbhojan Thali next 3 months rupees 5 only decisions cabinet meeting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x