24 November 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

मातोश्री-2 संबंधित व्यवहारावरून काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांवर धक्कादायक आरोप

Cash Deal, CM Uddhav Thackeray, Matoshri 2, Sanjay Nirupam, ED demands inquiry

मुंबई, ९ जुलै : वांद्रेमधील कलानगर भागातील मातोश्रीजवळच मातोश्री-2 ही आठ मजली इमारत उभारण्यात आली आहे. मातोश्रीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवी मातोश्री-2 ची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत राहण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सभापती केले. मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या हाती असायचा. अनेक राजकीय हालचाली मातोश्रीवरून घडल्या आहेत. त्याच्या जवळच मातोश्री-2 ही नवी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र याच मातोश्री २ च्या व्यवहारावरून काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

वांद्रे कलानगर परिसरात कलाकार के के हेब्बर राहत होते, १९९६ मध्ये हेब्बर यांच्या निधनानंतर ही जागा पत्नीच्या नावावर झाली. ती वारसा हक्काने मुलांकडे आली. २००७ मध्ये हेब्बर यांच्या मुलांनी मालाड येथील प्लॅनेटियम इन्फ्रास्ट्रक्चरला ही जागा ३.५ कोटींमध्ये विकली. त्यानंतर प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागी ८ मजल्यांची इमारत बांधण्याची परवानी घेतली होती. मात्र कालांतराने ही जमीन ठाकरे कुटुंबीयांनी ५.८ कोटींना प्लॅनेटियम कंपनीकडून विकत घेतली होती.

संजय निरुपम यांनी नवीन ट्विस्ट समोर आणला आहे. स्टर्लिंग बायोटेक संदर्भात दिल्लीतील चौकशी संपली असेल तर ईडीने मुंबईकडे लक्ष केंद्रीत करावं. स्टर्लिंग बायोटेकचे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या मालमत्ता व्यवहारातून अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला सापडू शकतात. राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले, बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. मुंबईच्या बाजारभावापेक्षा अत्यंत कमी मूल्य या संपत्तीच्या खरेदीत झालं. यात चेक पेमेंटशिवाय मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करण्यात आल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

 

News English Summary: Rajbhushan Dixit got only Rs 5.8 crore for 10,000 square feet Matoshri 2, an area like BKC. The purchase of this property was much less than the market price of Mumbai. Sanjay Nirupam has claimed that a large amount of cash was transacted without check payment.

News English Title: How much cash did Uddhav Thackeray give for Matoshri 2 Congress leader’s ED demands inquiry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x