22 November 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सारथीला तातडीने ८ कोटींचा निधी देणार; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Govt, Sarathi, Ajit Pawar

मुंबई, ९ जुलै : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पवार यांनी दिली. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.

तत्पूर्वी, मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेतली. ‘मी इथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी महत्त्वाची आहे,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मध्यस्थी करून गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे बैठकीत झालेला गोंधळ मिटला.

 

News English Summary: The Sarathi will not close. The Sarathi organization will be taken over by the planning department. Also, a fund of Rs 8 crore will be given to Sarathi tomorrow, ”informed Ajit Pawar.

News English Title: Maharashtra Govt Will 8 Crore Fund To Sarathi Ajit Pawar Announced Decision News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x