22 November 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा - गजानन काळे

MNS Navi Mumbai President Gajanan kale, Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana, Ccorona patients

नवी मुंबई, ९ जुलै : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.

शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले होते.

दरम्यान मनसे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी याच विषयाला अनुसरून त्याचा संदर्भ सध्याच्या कोरोना आपत्ती आणि सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाशी जोडून राज्य सरकारला एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्यां कोरोनाबाधित रूग्णांना देण्याचा निर्णय घ्या.’ अशी मागणी मनसे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब आणि असहाय्य जनतेस अनेक आजारांवर पुरेशी शासकीय मदत मिळवून देणारी एक उत्तम योजना आहे. मात्र हीच योजना कोरोनाबाधीत रूग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. या योजनेतील अटीनुसार जर कोरोनाबाधीत रूग्ण व्हेंटीलेटरवर असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र सरकारी आकडेवारीचा अभ्यास करता एकूण रूग्णांपैकी १/२ टक्का रूग्णांनाही व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत नाही. याचाच अर्थ ही योजना महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांच्या १ टक्का रूग्णांनाही फायद्याची ठरत नाही. त्यातच शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक किंवा दोनच खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला याचा अजिबात लाभ मिळू शकत नाही. असं मनसेने पत्रात म्हटलं आहे.

काय आहे नेमकं संपूर्ण पत्र;

 

News English Summary: MNS leader Gajanan Kale has demanded the Chief Minister to take a decision to give the benefit of Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana to all the corona affected patients.

News English Title: MNS Navi Mumbai President Gajanan Kale demand to implement Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana to all corona patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GajananKale(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x