22 November 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे - पंतप्रधान

PM Narendra Modi. Covid 19, Indian Economy

नवी दिल्ली, ९ जुलै : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानं आज उच्चांक गाठला. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 24 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली.तर, 487 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

दरम्यान, सध्या देश कोरोना नावाच्या व्हायरससोबत लढतो आहे. मात्र भारत हा देश प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगतो आहे. एकीकडे देश करोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करतो आहे. तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचं लोकांच्या आरोग्यसोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे जगभरातील कंपन्यांनी भारतात यावं, भारतात विविध क्षेत्रात प्रचंड संधी आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया ग्लोबल विक २०२० या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना त्यांनी जागतिक कंपन्यांना भारतात येण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमात जगभरातील ३० देश सहभागी होते.

आपला देश जेव्हा एखाद्या संकटातून उभारी घेण्याची गोष्ट करतो आहे त्याचा अर्थ ही उभारी देशाच्या आरोग्याला आणि त्यासोबत अर्थव्यवस्थेलाही मिळणार आहे. अशक्यही शक्य करुन दाखवायचं ही भारतीयांची प्रेरणा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी देशाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

News English Summary: On the one hand, the country is facing a global crisis called Corona. On the other hand, Prime Minister Narendra Modi has said that as a government, we care about the health of the people as well as the health of the economy.

News English Title: With An Increased Focus On Peoples Health We Are Equally Focussed On Health Of Economy Says Pm Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x