25 November 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

विरोध झुगारून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर

Procedure Sop, Final Year Examination, UGC

नवी दिल्ली, ९ जुलै: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

उदय सामंत यांनी सांगितलं की, या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक यांच्यासोबत परीक्षांसदर्भात चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं.

उदय सामंत पुढे म्हणाले की, “अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आलं.”

मात्र महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

यूजीसीने बुधवारी या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. या पत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलंय की, करोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल. यामध्ये दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणं आहेत, त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

युजीसीने जाहीर केलेली कार्यपद्धती (एसओपी)

  • परीक्षार्थींना आरोग्याशी संबंधित एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल.
  • प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगन उपलब्ध असेल
  • ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल.
  • परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा विशेष पालन करण्यात येईल.
  • त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य असेल
  • परीक्षा केंद्रातील फरशी, दरवाजे, भिंती, फर्निचर, रेलिंग, जिना या सर्वांना निर्जंतुक केले जाईल.
  • सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवले जातील.
  • येण्याच्या आणि जाण्याच्या जागी गर्दी करता येणार नाही.
  • परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद केली जाईल, यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येईल.

परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्था अशी असेल

  • परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा
  • दोन विद्यार्थ्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असेल
  • एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.

 

News English Summary: While there is still confusion among colleges and universities about conducting final year exams, the Union Ministry of Manpower Development on Thursday announced the standard procedure for final year exams. According to the UGC rules, final year exams are required, according to the Union Home Ministry.

News English Title: Procedure Sop For Final Year Examination Announced By UGC News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x