22 November 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

महाराष्ट्रात ६ हजार ७८५ नवे कोरोना रुग्ण, तर २१९ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, ९ जुलै : कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

आज २१९ मृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबईतील ६८, ठाणे ८, ठाणे मनपा २०, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ७, रायगड ९, पनवेल मनपा ८, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदूरबार २, पुणे २, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा ३, जालना १, लातूर मनपा १, नांदेड १, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा १, अन्य राज्य/ देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 6,785 new corona patients have been found in Maharashtra. 219 deaths were reported. In the last 24 hours, 4,067 patients were cured. As a result, 1 lakh 27 thousand 259 patients have been cured in the state till date.

News English Title: 6875 New Covid19 Positive Cases 219 Deaths 4067 Recovered In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x