24 November 2024 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मनसेचं मुंबईत गरीब मराठी 'महिला सबलीकरण'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० गरजू मराठी महिलांना ऑटो रिक्षाचे मोफत वाटप करण्यात करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांच्या पुढाकाराने मुलुंड पश्चिमेकडील गरजू मराठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनसेचं महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले असून महिलांनी सुद्धा त्यासाठी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणाचं एक चांगलं उदाहरण शहरवासीयांपुढे ठेवले आहे. मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत या  १०० ऑटो रिक्षांचे वितरण तेथील गरजू महिलांना करण्यात आले.

महिलांना रिक्षा वाटप झाल्यानंतर मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x