बुद्धिबळ एक विस्मयकारक खेळ!
बुद्धिबळ हा खेळ आजपासून १५०० वर्षांपूर्वी शोधला गेला असा उल्लेख बऱ्याच पुस्तकातून केलेला आढळतो. बुद्धिबळ या खेळाची सुरवात भारतातच झाली. मी वाचलेल्या अनेक पुस्तकात बुद्धिबळाचा शोध कसा लागला यावर विविध तर्क वितर्क केले आहेत. असे मानले जाते कि उत्तर भारतात या खेळाची सुरवात झाली. जेव्हा तेथील स्थानिक राजा लढाईवर जात असे तेव्हा त्याची राणी त्याला एका पाटावर लढाई कशी लढावी याची व्यूहरचना करून देत असे. त्यातूनच मग पुढे याने खेळाचे रूप घेतले. चतुरंग हा खेळ सैन्याच्या चार अंगाने बनलेला – पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. चतुरंग या खेळाची लोकप्रियता वाढत गेली आणि मग तोच पर्शिया आणि युरोपात पोचला. चतुरंग, बुद्धिबळ, शतरंज आणि मग चेस अश्या नावांनी ओळखला जाणारा हा खेळ आज जगात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या इनडोअर खेळांपैकी एक आहे.
कालांतराने बुद्धिबळाच्या नियमांमधे बदल होत गेला. मंत्री (म्हणजे सध्याचा वजीर) हा फक्त तिरपे एक घर जाऊ शकत होता. उंट (त्या काळचा हत्ती) फक्त तिरपी दोन घरे जाऊ शकत होता. १८५० नंतर या खेळात काही ठराविक बदल करून त्याचे माणकीकरण करण्यात आले. आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पर्धात्मक खेळाची सुरवात झाली. १८८६ मध्ये ऑस्ट्रियाच्या विल्हेल्म स्टेनिझ ने बुद्धिबळ विश्व-विजेता हा खिताब जिंकला. बुद्धिबळाच्या खेळातील तोच सर्वात पहिला विश्व-विजेता आहे. याच विश्वविजेत्यांच्या यादीत १५वे नाव आहे भारताच्या विश्वनाथन आनंद चे. विश्वनाथन आनंद ने २००२ ते २०१२ या दहा वर्षांच्या काळात ५ वेळा जगज्जेते पद मिळवले.
बुद्धिबळ हा खेळ सर्वसामान्य माणसाला कंटाळवाणा वाटणे साहजिक आहे परंतु एकदा खेळाची समज व आवड निर्माण झाली कि त्या पासून लांब राहणे कठीणच आहे. बुद्धिबळ या खेळाची एक झलक तुम्हाला त्या खेळाची चटक लावू शकते असे म्हणणे काही अयोग्य ठरणार नाही. बुद्धिबळ या खेळाचे अनेक फायदे हि आहेत. वृद्धपकाळात होणारा अल्झायमर (स्मृती भ्रंश) हा रोग बुद्धिबळ खेळल्यामुळे होत नाही असा अभ्यास काही तज्ज्ञांनी सिद्ध केला आहे.तसेच शिक्षणात हि बुद्धिबळ खेळल्याने बरेच फायदे होऊ शकतात असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईतील एका बुद्धिबळ विशेष कार्यक्रमात बोलत असताना विश्वनाथन आनंदने बुद्धिबळाबद्दल त्याचे विचार व्यक्त केले. “बुद्धिबळ या खेळामुळे तुमची एकाग्रता वाढते. गणित, विज्ञान या सारख्या काठिण विषयांचा अभ्यास करताना त्याचा विशेष फायदा होतो. बुद्धीबळ हे तर्कावर आधारित असते, त्यामुळे तर्कावर आधारित गणिते सोडवण्यात त्याची मदत होते. या शिवाय नेहमी सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासाने करू शकता. फक्त एवढेच नाही तर बुद्धिबळ खेळल्याने तुमची स्मरणशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते. फक्त बुद्धिबळाच नाही तर कुठल्याही स्पर्धेला तुम्ही धैर्याने सामोरे जाऊ शकता” असे आनंदने सांगितले.
बुद्धिबळ कोणत्या वयात शिकले पाहिजे? खेळाडू आणि प्रशिक्षक असल्यामुळे मला अनेक पालक हा प्रश्न विचारतात. माझ्या अनुभवाप्रमाणे वयाच्या चौथ्या किव्वा पाचव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेणे योग्य आहे. कारण त्या वयापासून मुलांची आकलनशक्ती वाढत असते. बुद्धिबळ हा खेळ फक्त खेळ नसून एक कला आणि विज्ञान यांचा मेळ आहे. लहान मुले किव्वा मोठी माणसे सर्वांनीच हा खेळ शिकून या खेळाचा आनंद घेतला पाहिजे.
लेखक – अमर गोडबोले,
बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल