23 November 2024 7:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

८ पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? - प्रदीप शर्मा

Former encounter specialist, Pradeep Sharma, Mumbai Police, Vikas Dubey encounter

कानपूर, १० जुलै : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, मुंबईत एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती होती, ते माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी कानपूर एन्काऊंटरची पाठराखण केली आहे.

प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचं समर्थन केलं आहे. “मला वाटतं हा खराखुरा एन्काऊंटर आहे. ८ पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? आता पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर लगेच हे कार्यकर्ते समोर येत आहेत”, असं प्रदीप शर्मा म्हणाले. पोलिसांनी चांगलं काम केलं की लगेचच काही लोक प्रश्न उपस्थित करतात, असं शर्मा यांनी नमूद केलं.

 

News English Summary: Pradip Sharma has supported the Uttar Pradesh Police. “I think this is a real encounter. 8 Where were the social workers, human rights activists when the police were martyred? Now, as soon as the police encounter, these activists are coming forward, ”said Pradip Sharma.

News English Title: Former encounter specialist Pradeep Sharma supports UP police over Vikas Dubey encounter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#PradipSharma(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x