24 November 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

चिंताजनक! गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन कोरोना रुग्ण वाढले

India, Covid19, Corona Virus

मुंबई, 11 जुलै: देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही. रिकव्हरी रेट चांगला असेल तरी दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाख 20 हजार पार गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासांत देशात 519 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 22 हजार 123 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 385 कोरोनाग्रस्त रुग्णांनी या व्हायरसवर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून देशात दिवसाला २० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील पाच दिवसांपासून देशात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चार दिवसांत देशात एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर काम सुरू आहे. भारतातही १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील कोवॅक्सीन लाँच करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणं कठीण असल्याची माहिती मिळत आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 हे वर्ष येईल असं म्हटलं जात आहे. संसदीय समितीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षी कोरोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणं शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

News English Summary: India’s COVID19 case tally crosses 8 lakh mark with 519 deaths and highest single-day spike of 27,114 new cases in the last 24 hours. Total positive cases stand at 8,20,916 including 2,83,407 active cases, 5,15,386 cured, discharged, migrated 22,123 deaths: Ministry of Health

News English Title: Indias Covid19 Case Tally Crosses 8 Lakh Mark With 519 Deaths And Highest Single Day Spike Of Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x