25 November 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत

Telangana, body of corona patient, Auto rickshaw

हैदराबाद, १२ जुलै : देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णांची अनेक हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आता आणखी एक चित्र समोर आले आहे. हे चित्र तेलंगणातील आहे. तेलंगणाच्या निजामाबाद शहरात कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच नेण्यात आला.

वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय व्यवस्थापनाने 50 वर्षांच्या कोरोना रुग्णाचा मृतदेह कोणत्याही रुग्णवाहिकेविना अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे सोपविला. निजामाबाद सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेश्वर राव यांनी सांगितले की, मृतांचा नातेवाईक रुग्णालयात काम करतो. त्याच्या विनंतीवरून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या शवागारात काम करणा-या व्यक्तीच्या मदतीने मृतदेह ऑटोरिक्षात ठेवला. त्या ऑटोरिक्षातूनच तो मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला. या घटनेनं तेलंगणात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही हा प्रकार वाऱ्यासारखा पसरला आहे.

एएनआयशी बोलताना निजामाबाद शासकीय रुग्णालयातील नागेश्वर राव म्हणाले, “मृत व्यक्तीचे कुटुंब रुग्णालयातच काम करतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.” राव पुढे म्हणाले की, ‘मृत व्यक्तीच्या कुटुंबाने एका युवकाच्या मदतीने मृतदेह ऑटो रिक्षात नेला. दुसरा तरुण आमच्याच हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. नागेश्वर राव पुढे म्हणाले की, ’50 वर्षीय रूग्णाला 27 जून रोजी निजामाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते कोविड पॉझिटिव्ह होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.’

 

News English Summary: The body of a Corona patient was taken to the cemetery by auto rickshaw in Nizamabad, Telangana. The most shocking thing is that the body was taken away without the supervision of the hospital administration.

News English Title: Telangana body of corona patient taken to burial ground in auto rickshaw photo viral News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x