22 November 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

कोरोना लस बनविण्यात रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाची बाजी, सर्व चाचण्या यशस्वी

Russias Sechenov university, successfully completes trials, worlds 1st Covid 19 vaccine

मॉस्को, १२ जुलै : जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीचे उत्पादनही काही देशांमध्ये सुरू होत आहे. भारतातही कोरोना लसीच्या ह्युमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना संसर्ग खूप कमी झाला आहे. मात्र लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांवर ट्रायल करावे लागते, जेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे चीनने परदेशात लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमेरिकेनंतर ब्राझीलमधील कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. अशा परिस्थितीत ब्राझील कोरोना लसच्या चाचणीसाठी योग्य ठिकाण ठरू शकते. CanSino Biologics चे सह-संस्थापक किउ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. डोंग्झू म्हणाले की, फेज-3 चे ट्रायल लवकरच सुरू होईल. यावेळी 40 हजार लोकांना लस डोस देण्याची तयारी सुरू आहे.

मात्र कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियाने बाजी मारली आहे. रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाने म्हणटले आहे, की या व्हॅक्सीनचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडले आहेत. विद्यापीठाचा हा दावा सत्य सिद्ध झाला, तर ही कोरोना व्हायरसवरील जगातली पहिली व्हॅक्सीन ठरेल. अमेरिकेसह जगातील अनेक विकसित देश कोरोनावर व्हॅक्‍सीन तयार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. अनेक जण ट्रायलदरम्यान अयशस्वीही झाले आहेत. मात्र, रशियाने पहली व्हॅक्‍सीन यशस्वी झाल्याचा दावा करत बाजी मारली आहे.

इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने 18 जूनलाच रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या ​​परीक्षणाला सुरूवात केली होती. तारासोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनो व्हायरसविरोधातील जगातील पहिल्या व्हॅक्सीनचे स्वयं सेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

सेचेनोव्ह यूनिव्हर्सिटीने म्हटले आहे, की इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संपूर्ण संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19वरील व्हॅक्सीन यशस्वीपणे तयार करणे होता. लुकाशेव यांनी स्पुतनिकला सांगितले, की सुरक्षिततेच्या दृष्टाने या व्हॅक्सीनच्या सर्व बाबींची तपासणी केली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही व्हॅक्सीन लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

 

News English Summary: The clinical trials of the world’s first coronavirus vaccine on volunteers at Sechenov First Moscow State Medical University has been successfully completed, Vadim Tarasov, the director of the Institute for Translational Medicine and Biotechnology, told Sputnik, adding that the first group of volunteers would be discharged on Wednesday and the second on July 20.

News English Title: Russias Sechenov university successfully completes trials of worlds 1st Covid 19 vaccine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x