22 November 2024 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मध्य प्रदेश कर्नाटकप्रमाणे सोपं नाही, राजस्थानमध्ये सत्तापालट अत्यंत कठीण - सविस्तर वृत्त

Collapse Rajasthan State govt, Madhya Pradesh, Karnataka, Sachin Pilot, CM Ashok Gehlot

जयपूर, १३ जुलै : मध्यप्रदेश नंतर राजस्थान काँग्रेसमध्ये ही राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियाच्या बंडखोरीने कमलनाथ सरकार पडले. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे अशोक गहलोत यांचं सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गहलोत देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. आज गहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करु शकतात. सचिन पायलट यांच्या जागी रघुवीर मीना यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख असलेले खासदार राजीव सातव यांनी राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना निरोप पाठवला असून, ते आज संध्याकाळीच राजस्थानला रवाना होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. याआधी देखील राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात एक प्रकारची राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. राजस्थानातील सद्य राजकीय स्थितीची मध्य प्रदेश, कर्नाटक बरोबर तुलना केली जात आहे. या दोन राज्यातही काँग्रेसची सरकारे होती. पण मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी आणि कर्नाटकात आमदारांची बंडखोरी यामुळे तिथली काँग्रेसची सरकारे कोसळली.

आता राजस्थानची या दोन राज्यांबरोबर तुलना केली जात असली, तरी इथे आपल्याला आकडयांचा फरक समजून घेतला पाहिजे. कर्नाटक, मध्य प्रदेशात भाजपा बहुमतापासून फार लांब नव्हते. पण राजस्थानात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला मोठया प्रमाणावर आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. आकडयांची ही जमवाजमव करणे इतके सोपे नाहीय. सचिन पायलट यांनी त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे निवडून आलेले १०७ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे. भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि आरएलडीच्या एका आमदाराचा गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. म्हणजे १२२ ते १२३ आमदार गेहलोत यांच्यासोबत आहेत. कठिण परिस्थितीत त्यांना सीपीएमच्या दोन आमदारांचाही पाठिंबा मिळू शकते. म्हणजे संख्याबळ झाले १२५. सचिन पायलट यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तरी त्यांना कसे सामावून घ्यायचे हा सुद्धा भाजपासमोर एक मोठा प्रश्न असेल. कारण वसुंधरा राजे यांचा राजस्थान भाजपामध्ये दबदबा आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांना १२३ सदस्यांनी मतदान केले होते. दुसऱ्या बाजूला भाजपाकडे ७० आमदार आहेत. त्याशिवाय नागौरचे खासदार हनुमान प्रसाद बेनिवाल यांचा पाठिंबा आहे. त्यांचे तीन आमदारही भाजपासोबत आहेत. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमतासाठी १०१ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. आज काँग्रेसकडे १२२ तर भाजपाकडे ७५ सदस्य आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, कर्नाटक प्रमाणे राजस्थानात सत्ता पालट होणे इतके सोपे नाही. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे हे शक्य झाले.

 

News English Summary: Although Rajasthan is being compared with these two states, here we have to understand the difference in numbers. In Karnataka, Madhya Pradesh, the BJP was not far from a majority. But to prove a majority in Rajasthan, the BJP will have to get the support of a large number of MLAs.

News English Title: It difficult to collapse Rajasthan State government like Madhya Pradesh and Karnataka News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x