22 November 2024 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Google For India: गुगल भारतात ७५ हजार कोटीची गुंतवणूक करणार

Google, Invested 75000 Cr, India Digitization Fund, Google CEO Sundar Pichai

मुंबई, १३ जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.

“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.

“भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजीटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोकं स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक काम बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे.” असं पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.

सुंदर पिचाई यांनी केलेल्या घोषणेतला महत्त्वाचा भाग असा की, भारताच्या डिजिटायझेशनमध्ये याचा फायदा होईल. शिवाय भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.

 

News English Summary: Google has outlined its future investments and plans to invest 10 billion in India alone, or about Rs 75,000 crore. Google CEO Sundar Pichai made the big announcement today.

News English Title: Google To Invest 75000 Cr As India Digitization Fund Announced By Google Ceo Sundar Pichai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GoogleIndia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x