25 November 2024 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि भाजपच्या एकट्याच्याच १०५ - चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Sharad Pawar, Interview

कोल्हापूर, १३ जुलै : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.

सामनामध्ये शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत होणार म्हणून सामनाचा सेल वाढवला. या मुलाखती मधून सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश द्यायचा होता. या मुलाखातीमधून प्रशासनामध्ये चलबिचल पण सुरू होती. ती थांबवायची होती. तुम्ही वेगवेगळे लढून पाहायला होत. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जावू द्या. असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू. प्रामाणिक लढायचं. पण दोन दिवस आधी सेटलमेंट करायचं नाही. शरद पवार यांनी सत्तेचा दर्प म्हटलं. पण लोकांनी मतपेटीतून तस काही म्हटलं नाही. आम्ही काही म्हटलं, तर आमचे राऊत काहीही लिहितात अशी टीका देखील त्यांनी केली.

पुढे प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदार, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रशासनाला हे सरकार ५ वर्षे टिकणार आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा, असं म्हणत आहेत. पण सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. तुम्ही वेगळे लढला असता, तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या १० जागा निवडून आल्या असत्या. एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि आमच्या एकट्याच्याच १०५ निवडून आल्या आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

News English Summary: BJP state president Chandrakant Patil has reacted to Sanjay Raut’s interview with Sharad Pawar. This time, he has criticized the interview and also challenged the Mahavikasaghadi.

News English Title: BJP State President Chandrakant Patil Reaction On Sharad Pawar Interview News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x