शाळा सुरु करण्याची घाई नको आणि शाळांना राजकारणात ओढू नका - WHO'चा इशारा
वॉशिंग्टन, १४ जुलै : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये संसर्ग झालेल्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधॅनम घेब्रेयेसस यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.
जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.
News English Summary: Mike Ryan, head of the World Health Organization’s emergency department, said there should be no rush to start school. He has also appealed not to bring schools in politics.
News English Title: Coronavirus World Health Organization Urge Countries Not To Make Schools Into A Political Football News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC